राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ज्ञानेश्वर( माऊली ) कटके यांची शक्ती स्थळाला भेट

Dhak Lekhanicha
0

 राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ज्ञानेश्वर( माऊली ) कटके यांची शक्ती स्थळाला भेट


 शिरूर : सुदर्शन दरेकर (कार्यकारी संपादक)

 विधानसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी सर्व उमेदवार मतदारांच्या भेटीगाठी व गाव भेट दौरा आयोजित करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माऊली कटके यांना प्रत्येक गावातून तरुणांचे व महिलांचा वाढता पाठिंबा मिळत आहे शिंदोडी निमोणे मोटेवाडी चव्हाणवाडी गोलेगाव  तरडोबाची वाडी बोराडे मळा सरदवाडी या ठिकाणी मतदारांनी त्यांचे भव्य स्वागत केले. शिरूर हवेली तालुक्यात स्वर्गीय बाबुराव पाचर्णे यांनी दोन वेळा आमदारकीची निवडणूक जिंकलेली असताना त्यावेळी हवेली तालुक्याने मोठे मताधिक्य त्यांना दिलेले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माऊली कटके  स्वर्गीय बाबूराव पाचर्णे यांचे स्वप्न पूर्ण करतील असा विश्वास गावचे  सरपंच जगदीश पाचर्णे यांनी व्यक्त केले. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल पाचर्णे यांनी पूर्ण ताकद माऊली कटके यांच्या मागे असून त्यांचा विजय निश्चित आहे. शिरूर तालुक्यातून माऊली कटके यांना मोठे मताधिक्य मिळेल असे राहुल पाचर्णे यांनी सांगितले.

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!